शेत रस्त्यांची समस्या सोडवा; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्य शिव पानंद चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष शरद पवळे व राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर चळवळ सुरू करून राज्य सरकारने तसा परिपत्रक काढून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या असून त्याद्वारे प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार गटविकास अधिकारी भूमी अभिलेख अधिकारी यांच्या समन्वयाने शेत रस्ते मोकळे करण्याचे काम जोमाने सुरू आहे.

पारोळा येथे गटविकास अधिकारी मोरे तहसीलदार अनिल पाटील शेत रस्ते चळवळ समितीचे कार्यकर्ते यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतात असते व शिव रस्त्यांची समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावे व येत्या 26 जानेवारी 2025 पर्यंत समित्या स्थापन होऊन तसा अहवाल आम्हास द्यावा. गेल्या तीन महिन्यांपासून तहसीलदारांनी परिपत्रके काढून गटविकास अधिकारी यांनी परिपत्रकानुसार ग्रामस्तरीय समिती स्थापनेबाबत प्रक्रिया राबवावी व शेत रस्ता व शिव रस्ता समस्या सोडवण्यासाठी सहकार्याची भूमिका घ्यावी असे समितीच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी शेत रस्ता समितीचे व शेत रस्ता चळवळीचे व शेतकरी बांधव किशोर पाटील, भिकनराव पाटील, अनिल पाटील, संभाजी पाटील, संजय पाटील, दिलीप पाटील, विकास शिंदे, भाऊसाहेब पाटील, अरविंद बोरसे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Protected Content