
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतात सोलर प्लान्टला लावलेली ८० हजार रुपये किंमतीची वायर चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना जळगाव तालुक्यातील म्हसावद, विटनेर, बोरनार शिवारात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रवीण सुभाष शिंदे (वय ४०, रा. बाहेरपुरा, ता. पाचोरा) यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील म्हसावद, विटनेर व बोरनार शिवारातील शेतांमध्ये सोलर प्लान्ट बसविण्यात आले आहे. या प्लान्टला लावलेली ८० हजार रुपये किंमतीची डीसी केबल १७ सप्टेंबर रोजी रात्री १२ ते १८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान, चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी १९ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता प्रवीण शिंदे यांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ ईश्वर लोखंडे हे करीत आहे.



