जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर कसबे परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, एका शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल ५९ हजार ३०० रुपये किमतीची केबल लंपास करण्यात आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पांडुरंग धनराज बनकर (वय ५९) यांचे पहूर कसबे शिवारात गट नं. १११९ मध्ये शेत आहे. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे शेतकाम आटोपले होते. मात्र, १ फेब्रुवारीच्या सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांना विहिरीतील मोटरची आणि सौर पॅनेलची इलेक्ट्रीक केबल चोरीला गेल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी १७९४ फूट लांबीची ही वायर चोरून नेली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.




