
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात दक्षा फाउंडेशनतर्फे गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत ८०० वह्यांचे वाटप करण्यात आले, तसेच २०० वृक्षांची लागवड करण्यात आली.

पिंप्राळा परिसरातील ग्रामविकास विद्यालय, सोमाणी हायस्कूल आणि पी. एम. मुंदडे हायस्कूल या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.
या समाजोपयोगी कार्यक्रमाच्या प्रसंगी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते वह्या वाटप आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. २०० झाडे लावण्याचे काम ओंकार पार्क आणि गणपती नगर परिसर, पिंप्राळा येथे करण्यात आले, ज्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी आमदार राजूमामा भोळे यांच्यासोबत जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, दक्षा फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी सपकाळे, मंडळ अध्यक्ष अतुल बारी, समाजसेवक आशिष सपकाळे, शाळेचे मुख्याध्यापक डी. एस. कुमावत, जोगी, माजी नगरसेवक सुरेश सोनवणे, विजय पाटील, सरचिटणीस उमेश सूर्यवंशी, संदीप मराठे, माजी मंडलाध्यक्ष शक्ती महाजन, चंद्रशेखर पाटील, महिला मोर्चाच्या रेखाताई कुलकर्णी, शुभांगी बिऱ्हाडे, स्मिता वेद, शिवा पुरोहित, राजू डोंगरे, हरिओम सूर्यवंशी, खुशाल ठाकूर, मंदाताई सोनवणे, जयश्री पाटील, गीता शुक्ला, माधुरी हांडे, तसेच मंडल पदाधिकारी राज कोळी, राहुल लोखंडे, संजय तायडे, किरण भोई, अनुराज मराठे, नूर भाई, अंकित कोष्टी, जीभाऊ वानखेडे आणि अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



