जळगाव विभागीय एसटी कार्यशाळेचा स्नेहबंध कार्यक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव विभागीय एसटी कार्यशाळेतील जवळपास 300 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी स्नेहबंध कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ पाटील यांनी केले तर प्रास्ताविक प्रशांत चौधरी यांनी केले. खाजगी कंपनी असो की सरकारी कंपन्या असो.. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदानाची घोषणा केली जाते, बऱ्याच क्षेत्रात एक महिन्याचा अतिरिक्त पगार देखील दिला जातो. इतर अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना 50 हजार पेक्षा जास्त रुपयांची दिवाळी भेट देतात. परंतु एसटी महामंडळाकडून दिवाळी भेट म्हणून केवळ 5 ते 6 हजार रुपये मिळत असतात. वास्तविक पाहता एसटी महामंडळ हे प्रचंड नफ्यात असल्यामुळे कर्मचाऱ्यांना कमीत कमी 30 हजार रुपये तरी सानुग्रह अनुदान मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन गोपाळ पाटील यांनी केले.

कार्यक्रमातील वक्ते विलास सोनवणे यांच्यानुसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट ठेवण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असून एस टी महामंडळाच्या विकासासाठी सर्वच पक्षांनी एकत्र येऊन सर्वात आधी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे गरजेचे असल्याचे सांगितले. बांधा वापरा हस्तांतरित करा या योजनेअंतर्गत एस टी महामंडळाच्या जागा खाजगी ठेकेदारांना देऊ नये, असे प्रदीप दारकुंडे यांनी सांगितले. संयुक्त कृती समिती द्वारे आयोजित या कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वच कर्मचारी बंधू भगिनींनी अथक परिश्रम केलेत.

एसटी कर्मचाऱ्यांची एकी कायम राहावी व एसटी महामंडळाची प्रगती व्हावी या दृष्टिकोनातून या स्नेहबंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काही ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी वर्गणी जमा करून कार्यशाळेतील जवळपास 300 पेक्षा जास्त इतर कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. संयुक्त कृती समिती द्वारे मागील महिन्यात धरणे आंदोलन आयोजित केले होते या आंदोलनाला वर्कशॉप मधून शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात जळगाव विभागीय कार्यशाळेचे कौतुक करण्यात येत होते. त्याचप्रमाणे सरकारने पगार वाढ देखील जाहीर केलेली होती.. या अनुषंगाने ज्येष्ठ-कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करण्याचे ठरविले व कार्यशाळेच्या जवळच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी गर्दी करून आनंदोत्सव साजरा केला.

विशेष म्हणजे या कार्यक्रमात सर्वच संघटनांचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सदा सर्वदा संघटनांना योगदान देणाऱ्या व एसटी महामंडळासाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या ज्येष्ठ सभासदांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे काही सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील या प्रसंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास सोनवणे, प्रदीप दारकुंडे, सुरेश जयस्वाल, धीरज चोपडे, गोकुळ पाटील योगेश सपकाळे, जयंत हिवराळे, स्वप्निल तिडवणे, राहुल भालेराव, आकाश राजपूत, जितू ठाकूर, गणेश पारधी, अनिल बिरुडकर ,हर्षल ठाकूर, विवेक चौधरी, अविनाश सोनवणे,संजय सपकाळे, योगेश सोनवणे, गजू भाऊ सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Protected Content