सर्पदंशाने बारा वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

Crime

जळगाव प्रतिनिधी । अंगणात खेळत असताना सापाने चावा घेतलेल्या मुलाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज घडली. याबाबत एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

कैलास बारसिंग पावरा (वय-12) रा. कवठाड ता. धरणगाव हा 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत गोट्यागोट्या खेळत होता. खेळतांना गोटी गटारीत पडल्याने गोटी काढण्यासाठी हात गटारीत घातल्याने सापाने हाताला दंश केले. त्याला तातडीने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. आज उपचारा सुरू असतांना वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रविण पाटील यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी डॉ. प्रविण पाटील यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Protected Content