पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील शिरसमणी येथील वय वृद्ध ग्रस्त असलेले शेतकरी आपले शेतात काम करीत होते पावसाचे दिवस असल्याकारणाने शेतीची मशागत व पेरणी साठी आपली जमीन तयार करावी या हेतूने रतिलाल पवार हे शेतात काम करीत असताना त्यांना मनियार जातीचा अति विषारी सर्प ने डोस केल्यामुळे त्यांना अति गंभीर परिस्थितीमध्ये पारोळा येथील दोन-तीन दवाखान्यांमध्ये फिरवण्यात आले. याशिवाय सिविल हॉस्पिटल पारोळा असल्यावर देखील त्या ठिकाणी न जाण्याचा निर्णय शिरसमणी येथील ग्रामस्थांनी घेतला व रतिलाल पवार यांना डॉ संकेत खरे यांच्याकडे ऍडमिट करण्यात आले डॉ संकेत खरे यांनी देखील अतिशय तात्परतेने सर्प दंश असलेले इसम यांच्यावरती कोणताही स्वार्थ न ठेवता विचारपूस न करता आलेल्या रुग्णाला न्याय द्यायचा आणि मूर्तीच्या दाढेतून कसा वापस आणता येईल यावर प्रयत्न डॉक्टर संकेत खरे यांनी सुरू केले आपल्या अधिक परिश्रमाने आपल्याजवळ असलेल्या अधिक ज्ञानाने व योग्य ते औषधी गुणांनी सदर रुग्णास जीवदान मिळाले.
शिरसमणी येथील अनेक लोकांनी डॉ संकेत खरे यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या परमेश्वर आपल्या हातून असे चांगले उपचार करावे व मरणाऱ्या जीवदान मिळावे असे आपल्या कडून कार्य घडावे अशा शुभेच्छा शिरसमणी येथील नागरिकांनी दिल्या अतिशय कमी कालावधीमध्ये डॉ संकेत खरे यांनी ग्रामीण आणि शहरी भागामध्ये अतिशय अल्प दरामध्ये आपली सेवा दिलेली आहे याशिवाय त्यांच्या संकल्प आहे उपचाराशिवाय कोणी दगवायला नको तसेच कमी खर्चामध्ये उपचार हे वाक्य डॉ खरे यांचे स्वर्गीय वडील बिपिनचंद्र खरे यांनी आपल्या मुलाला म्हणजेच डॉक्टर संकेत खरे यांना बालपणीच शिकवणी दिलेले आहे त्यामुळेच डॉ खरे यांच्याकडे येणारा रुग्ण याची फसवणूक लुबाणूक व लूट होत नाही. त्यामुळे त्यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये आपल्या वडिलांचे आदेश आईचा आशीर्वाद व नागरिकांचे मन जिंकली आहे यामुळेच डॉक्टर संकेत खरे यांच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य रुग्णांसह नागरिकांमध्ये एक असता प्रेम आणि आपला डॉ. म्हणून एक छाप निर्माण झालेली आहे. आजकाल अनेक ठिकाणी अनेक डॉ. फक्त लुटमार करीत असतात परंतु रुग्णाला जीव लावणे रुग्णाची विचारपूस करणे रुग्णाच्या बजेट बघणे रुग्णावरती प्रेम करणे रुग्णाचा पैसा वाचविणे आणि याशिवाय तो कोणत्या समाजाच्या आहे किंवा तो कोण आहे ये न बघता त्याच्या पैसा कसा वाचेल व त्याच्यावर योग्य उपचार कसा होईल हे डॉ संकेत खरे ओळखतात व त्या हेतूनेच ते उपचार देखील करीत असतात तसेच जीवनात पैसाच महत्त्वाचा आहे असे देखील नाही असे देखील डॉ खरे बोलत असतात अशा डॉ. चांगल्या सेवा बद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा व त्यांच्याबद्दल आज देखील पारोळा शहर व ग्रामीण भागात आदर आहे.