वरणगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा : शिवसेना-उबाठाची मागणी

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येत्या 15 दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास वरणगांव नगरपरिषद वर हंडा व घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे .

शहरातील गेल्या तीन चार वर्षापासून महिन्यातुन फक्त दोन वेळा पाणी पुरवठा होत आहे.तसेच तो ही रात्री अपरात्री 12ते 2 वाजेच्या दरम्यान पाणी पुरवठा केला जातो. रात्री अपरात्री पाणी सोडल्यामुळे शहरातील ‘नागरीकांचे’खुप हाल होत आहे शहरातील नागरिकांच्या सहनशिलतेची हद्द संपली येत्या 15 दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास वरणगांव नगरपरिषद वर हंडा व घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे .

तसेच वरणगांवातील काही नागरीक भोगावती नदीवर मेलेले गुरे ढोरे खराब मांस फेकत असतात त्यामुळे तेथुन नदीच्या पाण्यात ते घाण मांस वाहुन‌ शहरात येत असते त्यामुळे नागरीकांना आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो अशी तोंडी तक्रार नगरपरिषदचे सुर्यवंशी यांना दिली.

यावेळी विलास मुळे उपजिल्हा प्रमुख,सुभाष चौधरी उपतालुकाप्रमुख,सुनील भोई शहर प्रमुख,सुकदेव धनगर,अशोक शर्मा उपशहरप्रमुख,गुणवंत भोई,आबा सोनार आदी उबाठा गटाचे कार्यकर्त मोठया संख्येने उपस्थित होते .

Protected Content