यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील आश्रय फाउंडेशन या नागरीकांच्या हितासाठी अग्रभागी राहणाऱ्या समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या मागणी यश आले असुन यावल नगर परिषदच्या वतीने साथी आजारााच्या पार्श्वभुमीवर शहरातील विविध ठिकाणी जंतु किटनाशक धुर फवारणी करण्यात येत आहे .
महाराष्ट्र राज्यात सर्वत्र मागील काही दिवसांपासुन मलेरिया डेंगुची साथ मोठया वेगाने पसरत असल्याने यावल येथील विविध समाजीक कार्यात अग्रेसर असलेले यावल नगर परिषदचे माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी नगर परिषदच्या आरोग्य विभाग प्रमुख सत्यम पाटील यांच्याशी तात्काळ संपर्क साधुन त्यांना वेगाने पसरत असलेल्या डेंगू मलेरिया या आजाराच्या साथी बाबतची जाणीव करून देत नगर परिषद प्रशासनाने नागरीकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी म्हणुन तात्काळ शहरात जंतुनाशक धूर फवारणी करावी अशी मागणी केली होती.
दरम्यान मागील चार ते पाच दिवसांपासून शहरासह परिसरात परतीच्या पाऊसाने दमदार हजेरी लावल्याने सदरच्या धुर फवारणीस थांबविण्यात आले होते. आता पाऊस थांबल्यामुळे शहरातील विस्तारित वसाहतीतील फालकनगर, आयशानगर, गंगानगर आदि परिसरात आरोग्य अधिकारी सत्यम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदचे कर्मचारी हे धुरफवारणी करीत असल्याचे दिसुन येत आहे .