Home Cities अमळनेर अमळनेर रेल्वेस्थानकाच्या कामांचा खा.स्मिता वाघ यांनी घेतला आढावा

अमळनेर रेल्वेस्थानकाच्या कामांचा खा.स्मिता वाघ यांनी घेतला आढावा


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमृत भारत योजनेअंतर्गत अमळनेर रेल्वे स्टेशन येथे सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी खा.स्मिता वाघ यांनी केली तसेच आधुनिकीरणाच्या कामांचाही आढावा घेतला.

यावेळी तिकीट घर, नवीन प्रशासकीय रेल्वेची इमारत, बंगाली फाईलकडून नवीन अतिरिक्त प्रवेशद्वार, प्रवाश्यांसाठी लिफ्टची व्यवस्था आदी कामांचा आढावा घेतल्याचे पहायला मिळाले. काही महिन्यांपूर्वी धार उरुस प्रसंगी झालेल्या दगडफेक व चेन पुलिंग संदर्भात किती आरोपी अटक झालेत. त्यातील बाकी आरोपी अल्पवयीन होते. त्यासंदर्भात चार्जशीट दाखल झाले का याचा देखील माहिती जाणून घेतली. दुसरीकडे तांबापुर व भरवस येथील बोगदा संदर्भात चर्चा करून नवीन मोठा रस्त्या तयार करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी अधिकारी वर्गास दिले.

खा. स्मिता वाघ हे अमळनेर रेल्वेस्थानकावर येणार म्हणून सर्व अधिकारी व कर्मचारी आवर्जून उपस्थित झाले होते. याप्रसंगी रेल्वेचे ए ई एन संजय गुप्ता,आय पी एफ सत्यजीत कुमार, इंजि पंकज हारेकर, प्रबंधक अनिल शिंदे, वाणिज्य निरीक्षक रवि पांडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.


Protected Content

Play sound