सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काही एक कारण नसताना एकाला विळ्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत संशयित महिलेवर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावदा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर दत्तात्रय साळी (वय-४५) रा. बुधवार पेठ, सावदा ता.रावेर जि. जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर साळी हा त्याच्या घरी उभा होाता. त्यावेळी काही एक कारण नसताना आशाबाई खुशाल साळी या महिलेने वेड्याचा असा उल्लेख करून शिवीगाळ करून तिच्या हातातील विळ्याने ज्ञानेश्वर साळी यांच्या तोंडावर वार केले. यामध्ये त्याच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे. या संदर्भात तातडीने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. ज्ञानेश्वर साळी याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी महिला आशाबाई खुशाल साळी हिच्या विरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार मेहमूद शहा करत आहे.