जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रवाशी ॲपेरिक्षाचे मागच्या चाकाचे बोनट तुटल्याने झालेल्या अपघातात रिक्षा पटली होवून ५ प्रवाशी जखमी झाल्याची घटना कानळदा रोडवर रविवारी ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमी झालेल्या प्रवाशांवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील आडगाव येथील १० जण हे धरणगाव तालुक्यातील चांदसर हे एका आजाराच्या उपचारासाठी रविवारी ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ॲपेरिक्षात बसून गेले होते. चांदसर येथील काम आटोपून पुन्हा ॲपेरिक्षाने आडगाव येथे परतत असतांना दुपारी ४ वाजेच्या सुमारास कानळदा रोडवर अचानक ॲपेरिक्षाच्या मागच्या चाकाचा बोल्ट तुटल्याने रिक्षाचे चाक बाहेर पडले. या अपघातात रिक्षा पटली झाली. या अपघातात हरेफा सिकंदर तडवी (वय-१९), शबनम चिंधू तडवी (वय-३३), फातेमा सुभेदार तडवी (वय-४५), हबीना सरदार तडवी (वय-३२), मजीद तडवी (वय-४२) आणि सलमा अरमान तडवी (वय-५२) रा. आडगाव ता. यावल हे गंभीर जखमी झाले आहे. अपघात घडल्यानंतर रस्त्यावरील वाहनधारकांनी तात्काळ मदतकार्य करून जखमींना त्वरीत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.