रावेरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा सहा बालकांवर हल्ला; प्रशासनाचे दूर्लक्ष

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी पाच ते सहा बालकांना चावा घेतल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरवासीयांनी नगरपालिकेकडे या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.

मुख्यधिकारी समीर शेख यांनी सांगितले की पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. भाजप दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत बारी यांनी नगरपालिकेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी सांगितले की अनेक वेळा पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदन दिले आहे, परंतु नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

शहरातील नागरिकांच्या मते, मोठ्या प्रमाणात कुत्रे मध्य प्रदेशच्या बऱ्हाणपूर येथून रावेर शहराजवळ सोडले जात आहेत. यामुळे पिसाळलेले कुत्रे लहान मुलांना चावा घेत आहेत. महिला वर्गातून नगरपालिकेकडे झोपेच सोंग सोडून प्रत्यक्षात कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Protected Content