Home क्राईम बहिणीचा कौटुंबिक वाद : मध्यस्थी करायला गेलेल्या भावावर जीवघेणा हल्ला !

बहिणीचा कौटुंबिक वाद : मध्यस्थी करायला गेलेल्या भावावर जीवघेणा हल्ला !


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शकीला अज्जन स्कूल परिसरामध्ये कौटुंबिक वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. चुलत बहिणीला सासरच्यांकडून होणारा त्रास थांबवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या भावालाच तिच्या सासरकडील मंडळींनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख जुबेर शेख जाबीर (वय ३७, रा. दत्त नगर) यांची चुलत बहीण बुसरा मुजीब बागवान हिला तिचे सासरचे लोक सतत त्रास देत होते. या त्रासाबद्दल सासरच्या मंडळींना समजावून सांगण्यासाठी शेख जुबेर हे त्यांचे मामा अस्लम यांच्यासह शकीला अज्जन स्कूलजवळील बहिणीच्या घरी गेले होते. मात्र, तिथे चर्चा करण्याऐवजी सासरच्या मंडळींनी संताप व्यक्त केला.

वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले. यावेळी बहिणीच्या सासरच्या मंडळींनी तरूणावर जीवघेणा हल्ला चढवला. आरोपींपैकी एकाने शेख जुबेर यांच्या डोक्यावर ‘फायटर’ने गंभीर वार केले. इतकेच नव्हे तर, चुलत बहिणीलाही चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि शिवीगाळ केली.

या प्रकरणी पोलिसांनी दानिश हबीब बागवान, हमिद अब्दुल लोटू, रफिक अब्दुल लोटू, मुजीब रफिक बागवान, तबंसुम रिज़वान बागवान, अल्ताफ ईसाक बागवान, अल्ताफ ईसाक बागवान (दुसरा), अशपाक ईसाक बागवान आणि अशरफ ईसाक बागवान अशा एकूण ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक भारती काळे करत आहेत.


Protected Content

Play sound