चोपडा प्रतिनिधी । येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित अध्यापक विद्यालय येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेसाठी भावगीत व भक्तीगीत असा विषय होता. यात अध्यापक विद्यालयाने यश संपादन केले.
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था जळगाव व अध्यापक विद्यालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव माधुरीताई मयूर व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे डॉ राजेंद्र महाजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. उदघाटन प्रसंगी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे डॉ राजेंद्र महाजन यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांच्या माध्यमातून स्वतःचे व्यक्तिमत्व कसे घडवावे, सोबतच आपल्या गुणवत्तेने आपल्या विद्यालयाचीही गुणवत्ता कशी टिकून राहील यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले. तर चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव माधुरीताई मयूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी प्रत्येक कार्य मनापासून करावे, दुसर्याशी तुलना न करता स्वतःच स्वतःशी तुलना करा असे सांगितले. यावेळी मंचावर संस्थेचे समन्वयक गोविंदभाई गुजराथी, उल्हासभाई गुजराथी, डी टी महाजन, प्राचार्य जी बी शिंदे, प्राचार्य योगिता बोरसे, माजी प्राचार्य किरण पाटील, प्रताप विद्या मंदिराचे उपप्राचार्य जोगेश शेलार, पर्यवेक्षक वाय एच चौधरी, आर आर शिंदे उपस्थित होते.
गीत गायन स्पर्धेत जिल्ह्यातील ८ अध्यापक विद्यालयातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता , त्यात प्रथम नूतन मच्छीन्द्र रायसिंग ( अध्यापक विद्यालय, चोपडा), द्वितीय कॅलेब सॅम्युअल खंडागळे (बियाणी अध्यापक विद्यालय, भुसावळ), तृतीय दिक्षा मंगल साळवे (शिक्षणशास्त्र विद्यालय, जळगाव), उत्तेजनार्थ साक्षी संजय तायडे (अध्यापक विद्यालय, खिरोदा) याना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रताप विद्या मंदिराचे पंकज नागपुरे व कला, शास्त्र, वाणिज्य महाविद्यालय चोपड्याचे किशोर खंडाळे यांनी केले. स्पर्धकांना प्र.वि.म.चे तबल्यावर देवेंद्र वैद्य तर हार्मोनियमवर प्रदीप कोळी यांनी साथ संगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा मनोहर मराठे व आभार प्रा संजय देशमुख यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा रुपेश नेवे, प्रा स्वाती गुजराथी, प्रा मिनल पाटील, महेंद्र पटेल, दीपक विसावे, जितेंद्र पाटील यांच्यासोबत प्रथम व द्वितीय वर्षाच्या छात्रध्यापकांनी परिश्रम घेतले.
जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धेत अध्यापक विद्यालयाचे यश
5 years ago
No Comments