युध्दाचा साईड इफेक्ट : शेअर बाजारात हाहाकार !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याचा मोठा फटका शेअर बाजाराला बसला असून आज बीएसई आणि एनएसईमध्ये गुंतवणुकदारांचे तब्बल १० लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले.

आज सकाळीच रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा केल्यानंतर शेअर बाजार कोसळला. बाजार सुरू होताच सेन्सेक्स १,६०० अंकांनी घसरला. ही घसरण २७०० अंकांपर्यंत गेली होती. तर एसएसई सुध्दा ८१५ पॉईंटने कोसळला. आज झालेल्या पडझडीत जवळपास १० लाख कोटींचे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे. मागील काही दिवसांपासून शेअर बाजारावर युद्धाच्या तणावामुळे विक्रीचा दबाव आहे.

युक्रेन आणि रशियामधील वाद वाढल्याने आज सलग सातव्या दिवशी बाजारात विक्रीचा सपाटा सुरू आहे. मागील सात  दिवसांत गुंतवणूकदारांचे १६ लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

भारताप्रमाणेच जगभरातील शेअर बाजार सुध्दा युध्द सुरू झाल्याने कोसळले आहेत. तर दुसरीकडे कच्च्या तेलाचे दर सुध्दा प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या पलीकडे गेले आहेत. यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात कडाडणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

 

Protected Content