पतियाळा (वृत्तसंस्था) सिद्धू महत्वाकांक्षी आहेत हे ठीक आहे. लोक महत्वाकांक्षी असतात, मी त्यांना लहानपणापासून ओळखतो. त्यांच्यासोबत माझे कोणतेही वैचारिक मतभेद नाहीत. मात्र, त्यांची राजकीय महत्वाकांक्षा मोठी असल्याने त्यांना माझ्या जागी मुख्यमंत्री व्हायचेय त्यामुळेच ते चुकीची विधानं करीत आहेत, असा खळबळजनक आरोप पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केला आहे.
पंजाबच्या 13 मतदारसंघातसाठी सातव्या टप्प्यात मतदान होत आहे. सीएम कॅप्टन अमरिंदर सिंगंनी पटियालाच्या पोलिंग बुथ क्रमांक 89 वर आपले मतदान केले. मतदान झाल्यावर नवज्योत सिंग सिद्धूबद्दल म्हणाले की, सिद्धूंना माझ्याजागी मुख्यमंत्री व्हायचंय, त्यामुळेच ते चुकीची विधानं करीत आहे. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पंजाबमध्ये पुन्हा एकदा राजकारण तापायला लागले आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यामधील शीतयुद्ध पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांमुळे समोर आले आहे.