सिद्धेश्वर वाघुळदे यांनी घेतले हिंगोणा गावातील पाच विद्यार्थ्यांचे पालकत्व

 यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील हिंगोणा येथे शाळेत शिक्षण घेत असलेले होतकरू व तीव्र इच्छा आणि क्षमता असून ही परिस्थिती अभावी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात शैक्षणिक आणि भौतिक सुविधांच्या अभावी बाधा येत असते. प्रसंगी उदरनिर्वाहाच्या गरजेपोटी असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका असतो. ही गोष्ट लक्षात घेऊन तालुक्यातील फैजपूर येथील रहिवासी तसेच जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी जळगावचे संचालक सिद्धेश्वर वाघुळदे यांनी प्रभात विद्यालय हिंगोणा येथील शाळेतील पाच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले.

सिध्देश्वर वाघुळदे सरांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सरांनी यांनी विद्यालयातील आलिया शरीफ तडवी (इयत्ता पाचवी) वैष्णवी विजय सोनवणे (इयत्ता पाचवी )जीवन विठ्ठल मोरे (इयत्ता सहावी) मेघा सुभाष आदीवाले (इयत्ता सहावी ) तसेच वैभव गौतम कोचुरे (इयत्ता सातवी ) या पाच विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले. या अंतर्गत हे विद्यार्थी जोपर्यंत विद्यालयात शिकतील तोपर्यंत त्यांचा सर्व शैक्षणिक खर्चाचा भाग श्री सिद्धेश्वर सर उचलणार आहेत. तसेच प्रत्येक वर्षी नवीन पाच विद्यार्थ्यांचे पालकत्व आपण स्वीकारू असा मानस त्यांनी व्यक्त केला. याची सुरुवात म्हणून त्यांच्या वाढदिवशी म्हणजेच दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजी या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या एका संचाचे वाटप विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज गाजरे सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. श्री सिद्धेश्वर सरांच्या या आगळया वेगळ्या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content