Home Cities पारोळा सिद्धेश्वर महादेव मित्र मंडळाकडून नगरसेवक भूषण टिपरे यांचा सत्कार

सिद्धेश्वर महादेव मित्र मंडळाकडून नगरसेवक भूषण टिपरे यांचा सत्कार


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील सामाजिक, धार्मिक आणि पर्यावरणीय उपक्रमांना नेहमीच प्राधान्य देणाऱ्या नगरसेवक भूषण भाऊ टिपरे यांचा सिद्धेश्वर महादेव मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल तसेच त्यांनी यापूर्वी केलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या कृतज्ञतेपोटी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सुमारे दोन वर्षांपूर्वी नगरसेवक भूषण टिपरे यांच्या वतीने पारोळा येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात २२ नारळाची झाडे देण्यात आली होती. ही झाडे केवळ देऊन न थांबता, त्यांचे योग्य प्रकारे संगोपन व्हावे यासाठीही प्रयत्न करण्यात आले. आज ही झाडे चांगली वाढलेली असून, मंदिर परिसराच्या सौंदर्यात आणि पर्यावरण संवर्धनात मोलाची भर घालत आहेत. याच निमित्ताने सिद्धेश्वर महादेव मित्र मंडळाने भूषण भाऊ टिपरे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचा सत्कार केला.

या कार्यक्रमात नगरसेवक भूषण टिपरे यांनी झाडांच्या संगोपनासाठी विशेष योगदान दिलेल्या सुभाष नामदेव पाटील यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला. “झाडे लावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांचे संगोपन करणेही आवश्यक आहे. सुभाष पाटील यांनी ही झाडे आपल्या मुलांप्रमाणे वाढवली, ही बाब समाजासाठी प्रेरणादायी आहे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सत्कार समारंभाला माजी नगरसेविका रेखाताई चौधरी, प्रमिलाताई जोगी, कैलास चौधरी, गणेश पाटील, जयेश महाराज, विशाल साळी, दिलीप शिंपी, मयूर चौधरी, निखिल चौधरी, गणेश खाडे, धोंडू सकट, महेश चौधरी, चेतन वैष्णव तसेच सिद्धेश्वर महादेव मित्र मंडळाचे अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नगरसेवक भूषण भाऊ टिपरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound