Home Cities चाळीसगाव पिलखोडचा सिद्धार्थ झाला पोलीस उपनिरीक्षक अधिकारी

पिलखोडचा सिद्धार्थ झाला पोलीस उपनिरीक्षक अधिकारी


pilghod

चाळीसगाव (प्रतिनिधी)। तालुक्यातील पिलखोड येथील प्रकाश राघो यशोद यांचा मुलगा सिद्धार्थ यशोद यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. अतिशय गरिब, शेतकरी परिवारातील मेहनती, मुलगा जिद्दीने ग्रामीण भागात शिक्षण घेऊन पोलीस उपनिरीक्षक या पदापर्यंत पोहचण्यासाठी अतिशय मेहनत घेतली.

 

यशोद परिवाराचे व पिलखोड गावाचे नावलौकीक केले. सिद्धार्थच्या पुढील वाटचालीस मित्र परिवाराने शुभेच्छा दिल्यात. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यज्ञेश बाविस्कर, संगम यशोद, गिरीधर पानपाटील, दिनेश कोळी, रुपेश बाविस्कर, मंगेश यशोद यांनी सिद्धार्थचा सत्कार केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound