अमळनेर (प्रतिनिधी) । चांदा गावाचे भुषण व महाराष्ट्रातील पहिल्या महिला कराटे ब्लॅकबेल्ट धारक शिक्षिकेचा बहुमान पटकवणाऱ्या, महिला व मुलींच्या सबलीकरणासाठी अथक परिश्रम घेऊन मुलींना मोफत स्व-संरक्षणाचे धडे देणाऱ्या, रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या आयएसओ मानांकित शाळेतील शिक्षिका सुलक्षणा बाबासाहेब राशिनकर यांना सह्याद्री मल्टिसिटी निधी लिमिटेड अहमदनगर यांच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात व महिला सक्षमीकरणात विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांना दिला जाणारा “सह्याद्री आयडॉल लेडी पुरस्कार-२०१९’ जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार त्यांना येत्या ९ मे रोजी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद यांच्या शुभहस्ते व शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत माऊली सभागृह अहमदनगर येथे आयोजित कार्यक्रमात समारंभ पुर्वक प्रदान करण्यात येणार आहे. राशिनकर यांना या अगोदर “इनोव्हेटिव्ह टीचर्स ऑफ इंडिया इंटरनॅशनल अवॉर्ड, प्रेरणा पुरस्कार(महाराष्ट्र पत्रकार संघ), राष्ट्रशाहीर अमर शेख राष्ट्रीय पुरस्कार, हिरकणी पुरस्कार, झी मराठी संक्रांती क्वीन” यासारख्या अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले असुन जागतिक महिला दिननिमित्ताने झी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र या वाहिन्यावर विशेष मुलाखती प्रसारित झालेल्या आहेत. अशा अष्टपैलू व महिला सक्षमीकरणात विशेष योगदान असणाऱ्या व्यक्तिमत्त्वास सह्याद्री आयडॉल लेडी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ यांच्या कडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सौ.राशिनकर या
महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य संपर्क प्रमुख बाबासाहेब राशिनकर यांच्या पत्नी व राज्यस्तरीय आदर्श मातोश्री पुरस्काराने सन्मानित कस्तुरीताई राशिनकर यांच्या सुनबाई आहेत. त्यांच्या यशाचे अभिनंदन महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, व राज्य कार्यकारणीचे पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सदस्य यांनी सोशलमिडीयावर अभिनंदनाचा वर्षाव केला.