जळगाव , संदीप होले । वॉटरग्रेस कंपनीतर्फे कचरा संकलनासाठी लावण्यात येणार्या ट्रॅक्टरसह अन्य वाहनांमध्ये कचर्याऐवजी तोडलेली झुडपे असल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे.
वॉटरग्रेस कंपनीच्या कामकाजाबाबत नाराजीचे सूर उमटत असतांना त्यांना पुन्हा कचरा संकलनाचे काम देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना कालिंका माता चौकाजवळच्या तोल-काट्यावर या वाहनांचे वजन होत असतांना दिसून आल्यानंतर त्यांनी याची विचारणा केली असता संबंधीतांची धांदल उडाली. वॉटरग्रेसतर्फ कचरा संकलन केल्यानंतर त्याचे वजन वाढविण्यासाठी वाहनांत दगड, माती, मातीमिश्रित कचरा भरला जाण्याचा प्रकार यापूर्वी घडला आहे.
आज अभिषेक पाटील यांनी कालंकी माता चौकात तोल काट्यावरील वाहनांची तपासणी केली असता त्यांना काचऱ्याऐवजी तोडलेली झुडपे भरलेली आढळून आली. त्यांनी सहाय्यक उपायुक्त पवन पाटील यांना प्रचारण करत त्यांना जाब विचारला.
याप्रसंगी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना पाटील सांगितले की, कचरा संकलन करारनामानुसार जीपीएस सिस्टम लावण्यात आलेले नसल्याने ह्या गाड्या बाहेर गावावरून भरून आणले नसतील का ? अशी शंका त्यांनी उपस्थितीत केली. घरकुल घोटाळानंतर हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले. तर सहाय्य्क उपायुक्त पवन पाटील यांनी मक्तेदाराला दंड ठोठाविण्यात येईल असे स्पष्ट केले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/632478077664828/