शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थान च्या पालखीचे १३ जून रोजी सकाळी सात वाजता पंढरीनाथाच्या दर्शनासाठी प्रस्थान होणार आहे.
श्री शेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतभरातून लाखो वारकरी भाविक आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होतात. यंदा १७ जुलैला देवशयनी आषाढी एकादशी आहे. या पार्श्वभूमीवर गावोगावीच्या भाविकांना पंढरीची वारीची ओढ लागली असून; शेतीची तसेच इतर कामे उरकून घेण्याची लगबग सगळीकडे सुरू आहे. पंढरीला पायदळ वारीने जाण्याची वारकरी सांप्रदायातील मोठी व प्राचीन परंपरा आहे. संतांनी सुरू केलेली ही परंपरा आज नित्याने दरवर्षी सुरू आहे.
आपल्या कुटुंबातील किमान एक व्यक्ती पंढरीला विठुरायाच्या दर्शनासाठी जाण्याची प्रथा आहे. विदर्भ पंढरीचा राणा श्री संत गजानन महाराज संस्थांची पालखी जवळपास ७०० वारकर्यांचं राज वैभवी थाटात पायदळ वारीने जाते .श्रींच्या पालखीचे यंदाचे ५५ वे वर्ष असून वारकर्यांची नावे नोंदणी सुरू आहे. श्री गजानन महाराज संस्थान कडून श्रींच्या पायी वारीचा दृष्टीने तयारी सुरू झालेली आहे.
श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा सोबत भगव्या पताका खांद्यावर घेतलेले श्वेत वस्त्रधारी ७०० वारकरी , दोनशे पताकाधारी २५० टाळकरी दोनशे सेवेकरी दोन रुग्णवाहिका , तीन माल ट्रक, अश्व ,एक प्रवासी बस पालखीत सोबत राहणार आहेत.
श्रींच्या पालखीतील वारकर्यांचा गणवेश पताकाधारी टाळकरी यांच्यासह व्यवस्थिततील सेवाधारी .तसेच पालखीसोबत वैद्यकीय पथक पाण्याची व्यवस्था याच्यासह इतरही सुविधा संस्थांकडून उपलब्ध करून देण्यात येतात. श्रींच्या पालखीतील शिस्त सर्वांना भावते.
१३ जून रोजी सकाळी सात वाजता श्रींच्या पालखीचे श्री संत गजानन महाराज संस्थान मधून श्रींच्या रजत मुखवट्याचे विधिवत पूजन करून प्रस्थान होणार आहे. तब्बल महिना नंतर ही पायदळ वारी १५ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पंढरपूर येथे श्री संस्थानच्या शाखेत पालखी १५ ते २० जुलै पर्यंत मुक्काम राहणार आहे.