Home Cities यावल उमेदवारीबाबत श्रीराम पाटलांनी घेतली भाजपा प्रदेशाध्यक्षांची भेट

उमेदवारीबाबत श्रीराम पाटलांनी घेतली भाजपा प्रदेशाध्यक्षांची भेट


shriram patil

रावेर, प्रतिनिधी | रावेर-यावल विधानसभा मतदार संघातुन उमेदवारीसाठी इच्छुक असलेले येथील उद्योजक श्रीराम पाटील यांनी नुकतीच भाजपा प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची मुंबईत भेट घेतली.

रावेर विधानसभा मतदारसंघातुन महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदचे उपाध्यक्ष ना. हरीभाऊ जावळे तसेच उद्योजक श्रीराम पाटील यांच्यासह अनेकजण भाजपाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. काल (दि.२८) झालेल्या भेटीप्रसंगी ना.पाटील यांनी श्रीराम पाटील यांच्याकडून रावेर मतदार संघाच्या पार्श्वभूमीबाबत माहिती जाणून घेतली तसेच त्यांचा बायोडाटाही स्वीकारला. यावेळी त्यांच्यासोबत दर्जी फाउंडेशन संचालक गोपाल दर्जी उपस्थित होते. त्यामुळे भाजपाची रावेरची उमेदवारी कोणाला मिळणार ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.


Protected Content

Play sound