भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । भडगाव तालुक्यातील पिचर्डे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आदर्श शेतकरी श्रीराम रामदास पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने सहकार क्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावाच्या विकासासाठी आणि शेतकरी हितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या पाटील यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.
चार वर्षांपूर्वी पिचर्डे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संपूर्ण संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले होते. त्यानुसार ठरलेल्या कार्यकाळाच्या नियोजनाप्रमाणे विद्यमान चेअरमन उद्धव नामदेव महाजन यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी सर्व संचालकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत श्रीराम रामदास पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडीनंतर झालेल्या छोटेखानी सत्कार समारंभात व्हाइस चेअरमन हिलाल ओंकार महाजन, संचालक साहेबराव दौलत पाटील, उद्धव नामदेव महाजन, श्रावण रतन लिंडायत, मुरलीधर रामा पाटील, बबन मन्साराम पाटील, प्रविण सजन कुंभार, अशोक धर्मराज पाटील, हेमराज प्रकाश पाटील, सौ. बेबाबाई भालचंद्र पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. तसेच सचिव नानासाहेब मोतीराम पाटील, लिपीक वसंत पंडित पाटील आणि शिपाई निंबा बाबुलाल पाटील यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य जगदीश पाटील व पत्रकार धनराज पाटील यांनी नवनिर्वाचित चेअरमन श्रीराम पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पिचर्डे गावातील धनराज तुकाराम पाटील, विनोद महाजन, राहुल पाटील, निलेश घोडके, प्रेमराज पाटील आणि भाऊसाहेब न्हावी यांनीही अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
निवडीनंतर बोलताना श्रीराम पाटील यांनी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक सक्षम सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला. सहकाराच्या बळावर गावाच्या आर्थिक उन्नतीसाठी पारदर्शक व विकासाभिमुख कारभार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.



