चोपडा प्रतिनिधी । बहुचर्चीत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरु असताना १९९१ साली चोपड्यातून कारसेवेसाठी गेलेल्या रामभक्त कार्यकर्त्यांचा सत्कार राष्ट्रीय सुरक्षा मंचद्वारे करण्यात आला. या उपक्रमात ३७ कारसेवक व त्यांच्या कुटुंबीयांना गौरविण्यात आले.
प्रारंभी सकाळी गांधी चौकातील श्रीराम मंदिरात राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षीत अंतर बाळगत पूजन केले. ३७ कारसेवकांच्या निवासस्थानी जावून त्यांना शाल,श्रीफळ व श्रीराम प्रतिमा देवून गौरविण्यात आले. त्यामध्ये ज्येष्ठ कारसेवक तिलकचंद शहा, माजी आ.कैलास पाटील, अनिल पालिवाल, अनिल वानखेडे, दिलीप नेवे, सोपान जाधव (कठोरा), शामसिंग परदेशी, पवन अग्रवाल, घनःश्याम अग्रवाल, विश्वनाथ पाटील ( कठोरा), प्रकाश वाघ, पुनम भावसार, पांडुरंग चौधरी, राजूअण्णा वाणी, मुन्ना शर्मा, संजिव पाटील, विनोद पाटील, पंडित पाटील, किशोर पाटील (वेले), राजेंद्र शिंपी, सुनिल माळी, छोटू माळी, रेऊबा धनगर, नविन दिसावल, उल्हास गुजराथी, अशोक शहा (चहार्डी), राजेंद्र बडगुजर, रामदास गंभीर, कृष्णदास गुजराथी यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यानच्या काळात मयत झालेले कारसेवक स्व. रघुनाथ चौधरी, विठ्ठल पाटील, श्रीकृष्ण टिल्लू, सतिष गुजराथी, गोपाळ गवळी, रवींद्र शुक्ल, हेमंत बारी यांचा समावेश आहे. त्यांच्या कुटुंबियांना भेटून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा मंचचे संयोजक गोपाळ पाटील, सदस्य अॅड. धर्मेंद्र सोनार, यशवंत चौधरी, पंकज सुभाष पाटील, गजेंद्र जायसवाल, नरेंद्र पाटील, शाम सोनार, मनोज विसावे, सौरभ नेवे, संदीप पाटील, अॅड. शैलेष शर्मा, सुनिल सोनगिरे आदी उपस्थित होते.