यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील न्हावी येथील श्री स्वामी नारायण मंदिरात श्रीमद भागवत कथा सप्ताह भाविकांच्या मोठया उपस्थितीत उत्साहात सुरू झाला आहे.
न्हावी येथे संपन्न होणाऱ्या या संपूर्ण सप्ताहाचे आयोजन भुसावळ येथील श्री स्वामीनारायण गुरुकुलचे के.के.शास्त्री यांनी केले असून वक्ताश्री म्हणून वडताल गुजरात येथील मानस प्रकाशदास जी महाराज हे आहेत.
या सप्ताहात मंदिराचे कोठारी भगवान इंगळे तथा समस्त सत्संग समाज न्हावी तसेच संतगणात विष्णुप्रसादस्वामी, राधास्वामी, ऋषिस्वामी, गोपाळभगत, मनिषभगत यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे, तर या सप्ताहात आज भगवान श्रीकृष्ण व रूख्मीनी यांचा विवाह कथेतील प्रसंगानुसार रंगला.
यात यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी, यावल पंचायत समिती माजी गटनेते तथा संगोयोचे तालुका अध्यक्ष शेखर सोपान पाटील, विष्णु बोरोले, शशिकांत चौधरी, अनिल चौधरी, भानुदास चोपडे, डॉ.चंद्रकांत चोपडे, सातोद येथील धिरज कुरकुरे, सांगवी येथील युवराज भंगाळे आदी हरीभक्तगणांची मोठया संख्येत याप्रसंगी उपस्थिती होती.