यावल शहरात श्रीमद् भागवत व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दरवर्षी प्रमाणे यंदाही गंगानगर महादेव मंदिर येथे संगीतमय श्रीमद् भागवत व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. वक्ता वर कथा श्री श्री 1008 महामंडलेश्वर ह.भ.प. सूर्यभान महाराज शेळगाव तालुका यावल हे करत आहे. परिसरातील भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद या सप्ताहात मिळत आहे.

महाराज आपल्या मधुर वाणीत सांगताना श्रीमद् भागवत साराग्रंथाचा सार आहे भागवत कसे जगायचे व संस्कृती कशी टिकवायची. भरतखंडे नरदेहाची प्राप्ति हे तो परम भाग्याची संप्पती भारताच्या पवित्र मातीत महाराष्ट्र ही संताची भुमी आहे. पांडुरंगाने आपल्या ला संत भुमि मध्ये जन्म दिलाय न चुकता त्यांचे आभार मानायला रोज मंदिरात येत चला विश्व माऊली ज्ञानोबाराय जगत्गुरु तुकोबाराय यांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाने नेहमी चालण्याच्या प्रयत्न करूया मार्ग दाऊनी गेले आधी द्या निधी संत ते तेणेची पंथे चालो जाता न पड़े गुंता कोठे काही श्रीमद् भागवत म्हणजे ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण साक्षात भगवान श्रीकृष्णांचे स्वरूप आहे.

परीक्षीत राजाचे निमित्त करून जगत् ऊद्धाराचे हे साधन आपणांस प्राप्त झाले आहे तरी या ज्ञान गंगे मध्ये न्हाऊन आपल्या जन्माचे सार्थक करूया असे प्रतिपादन आदरणीय श्री ह भ प सुर्यभाननंदजी सरस्वती महाराज शेळगांवकर यांनी उपस्थित भाविक भक्तांना केले.

2५ जानेवारी पासून रोज शनिवार रोजी- श्री ह भ प विशाल राऊत महाराज जामनेर, 26 दिनांक शनिवार रोजी श्री ह भ प प्रवीण महाराज वाकड मलकापूर, 27 दिनांक सोमवार. सो ह भ प पूजा ताई पाडळसा तालुका यावल, 28 दिनांक मंगळवार सौ ह भ प प्रतिभाताई पाटील सोनगीर, दिनांक 29 बुधवार रोजी श्री ह भ प प्रकाश महाराज शेगाव, दिनांक 30 रोजी गुरुवार श्री ह भ प नारायण महाराज निंभोरा, दिनांक 31 रोजी शुक्रवार श्री ह भ प मनोज महाराज दुसरा, दिनांक १ शनिवार रोजी प्रिय बाबा दीपक महाराज बोर अंजनी चोपडा, याचे रोज यांचे आठ ते दहा या वेळेत भावीभक्त कीर्तनाचा लाभ घेत आहे तसेच दिंडी सोहळा एक फेब्रुवारी 2025 रोजी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

२ फेब्रुवारी रोजी रविवार श्री ह भ प सूर्यभान जी महाराज शेळगाव यांचे काल्याचे किर्तन होऊन स्वतःची सांगता होईल. या सप्ताहात गायनाचार्य हभप सोपान महाराज शेगाव, ह भ प प्रकाश महाराज मलकापूर, ह भ प प्रतीक महाराज धरणगाव, सकाळी काकड आरती ह भ प समिश्र वारकरी मित्र मंडळ तर चोपदार ह भ प गोटे महाराज साक्री, व गायन वादक ह भ प श्री प्रीतम महाराज सांगवी बुद्रुक, मृदुंग व तबलावादक ह भ प अजय महाराज कापूस वाडी ह भ प गणेश महाराज पाडळसे कर हे सेवा देत आहे

Protected Content