भुसावळ (प्रतिनिधी) येथील नगरपालिकेच्या आज (दि.११) झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील अनियमित पाणीपुरवठा आणि मुख्य रस्त्याचे झालेले निकृष्ट काम या विषयावर जोरदार गदारोळ होवून सभा स्थगित करण्यात आली. त्यानंतर विरोधक सतत गोंधळ घालत असल्याने अध्यक्षांनी सभेत चर्चेला असलेले सगळे विषय मंजूर झाल्याचे सांगून सभा संपल्याचे जाहीर केले.
आजची ही सभा वादळी होण्याची चिन्हे आधीपासूनच दिसत होती. रस्ता आणि पाणी या विषयावर विरोधक आक्रमक पावित्र्यात होते. त्याप्रमाणे आज सभा सुरु होताच गोंधळाला प्रारंभ होवून सभा स्थगित करावी लागली. एकूणच विरोधकांचा आक्रमक पवित्रा बघून अध्यक्षांनी सगळे विषय मंजूर झाल्याचे घोषित करून सभा संपल्याचे जाहीर केले.