Home धर्म-समाज श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे श्री दत्त जयंतीनिमित्त निघाली भव्य पालखी मिरवणूक

श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे श्री दत्त जयंतीनिमित्त निघाली भव्य पालखी मिरवणूक


पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील संघवी कॉलनी स्थित दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रात २८ नोव्हेंबर पासुन पहाटे पासुनच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशिर्वादाने व प. पु. गुरुमाऊली यांच्या आदेशानुसार श्री दत्त जयंती सप्ताहास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सलग ८ दिवस चाललेल्या या सप्ताहात २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या भुपाळी आरती नंतर गुरुचरित्र पारायण पठणास सुरुवात झाली.

या श्री स्वामी समर्थ केंद्रात यंदा तब्बल ६५० सेवेकरी पारायणास बसले आहेत. हा एक नविन रेकाॅड झाला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज यांची विधिवत पुजन, मंत्रोच्चार, गुरुचरित्र पारायण पठण यासह विविध सेवा घेण्यात येत आहेत. ४ डिसेंबर रोजी पाचोरा शहरातील महाराणा प्रताप चौकातील श्री दत्त मंदिरापासून भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली. सदरची पालखी मिरवणूक महाराणा प्रताप चौक, मानसिंगका काॅलनी, गाडगेबाबा नगर, संघवी काॅनली ते श्री स्वामी समर्थ केंद्रापर्यंत काढण्यात आली. या पालखी मिरवणूकी वाटेत रांगोळी काढत फुगडी खेळत तसेच डी. जे. च्या तालावर सेवेकऱ्यांनी नृत्य सादर केले.

श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ, सप्ताहात गुरुवार २७ नोव्हेंबर रोजी ग्रामदेवता सन्मान, मंडल मांडणी, शुक्रवार २८ नोव्हेंबर रोजी मंडल स्थापना, अग्नीस्थापना, स्थापित देवता हवन, सकाळी ८ च्या आरती नंतर संकल्प व गुरुचरीत्र वाचनास सुरुवात, शनिवार २९ नोव्हेंबर रोजी नित्यस्वाहाकार, श्री गणेशयाग व श्री. मनोबोध याग, रविवार ३० नोव्हेंबर रोजी नित्यस्वाहाकार, स्वामी याग, सोमवार १ डिसेंबर रोजी नित्यस्वाहाकार, गीताई याग, मंगळवार २ डिसेंबर रोजी नित्यस्वाहाकार चंडी याग, बुधवार ३ डिसेंबर रोजी नित्यस्वाहाकार, श्री. रुद्रयाग, व मल्हारी याग अशी सेवा रुजू करण्यात आली. गुरुवार ४ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती निमित्त नित्यस्वाहाकार, बली पूर्णाहुती, दुपारी १२:३९ श्रीदत्त जन्मोत्सव, आरती, आज शुक्रवार ५ डिसेंबर – श्री सत्यदल पुजन देवता विसर्जन, अखंड नाम जय यज्ञ करुन सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे. या सप्ताहात परिसरातील तब्बल ६५० महिला, पुरुष, तरुण, तरुणी गुरुचरित्र पारायणास बसले होते. एकंदरीत श्री स्वामी समर्थ केंद्र भक्तीभावात तल्लीन झालेला आहे.


Protected Content

Play sound