श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मित्र मंडळाची कार्यकारणी जाहीर

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहरातील आझाद चौकामध्ये सालाबाद प्रमाणे रविवारी १८ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेला श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मित्र मंडळाची बैठक पार पडली. मागील वर्षा प्रमाणे या ही वर्षी नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली व नवनवीन सामाजिक व सांसकृतिक उपक्रम सादर होतील खानदेशामध्ये कानबाई मातेचे व आई सप्तशृंगी मातेच्या गाण्यांच्या शिरपूर येथील आबा चौधरी व धीरज किंग शिरपूरकर यांच्या कार्यक्रम नऊ तारखेला पार पडणार आहे व समर्पण गोशाळेचे संचालक ह.भ.प.रवीदास बाबा महाराज वरसाडेकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या वर चर्चा करण्यात आली व तसेच या वर्षी अध्यक्ष म्हणून गणेश चौधरी उपाध्यक्षपदी जयेश चौधरी, उपाध्यक्षपदी महेश चौधरी, खजिनदार योगेश दिलीप चौधरी यांची मंडळाच्या सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळेचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते व मंडळाचे हे ३ वे वर्ष असून मागील 2 वर्षाच्या कारकर्दीत अनेक नवनवीन उपक्रम मंडळातर्फे पारोळा शहरासाठी सादर करीत आहे. त्यात सामाजिक नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून हे पारोळा शहराच्या जनते समोर सादर करीत आले. तरी प्रत्येक उपक्रमांन मध्ये काही तरी नवीन बोध व नवीन आदर्श समाजासमोर मांडले आहेत. मंडळाचे वैशिष्ट्य आहे की यावर्षी पारोळा शहरातील महाप्रसाद रुपी भोजन ११००० गणेश भक्तांना करण्यात येणार आहे तरी शहरातील विविध मंडळाकडून गणेश मंडळाला प्रसादाच्या दिवशी श्रमदान करत असतात. अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार यांची निवड झाल्याबद्दल शहरातील विविध संघटना व राजकीय सामाजिक थरावरून त्यांच्या अभिनंदन करण्यात येत आहे.

Protected Content