Home Cities जळगाव श्रीराम नवमीनिमित्त शनिवारी किर्तनाचे आयोजन

श्रीराम नवमीनिमित्त शनिवारी किर्तनाचे आयोजन

0
19

IMG 20170404 WA0003

जळगाव (प्रतिनिधी)  श्रीराम नवमीनिमित्त शनिवार १३  रोजी हेमंत सुभाष भंगाळे फाउंडेशन संचालित जयश्रीराम मंडळ तर्फे सत्यनारायण पुजा व समाज प्रबोधनासाठी किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

काव्यरत्नावली चौक येथे सायंकाळी 7 ते 9 वा. दरम्यान हा सामाजिक कार्यक्रम होणार असून किर्तनकार  ह.भ.प. राजेंद. महाराज, पिंपळकोठेकर  हे गो हत्त्या, देश सेवा, बेटी बचाव बेटी पढाव, वृक्ष लागवड , पाणी अडवा- पाणी जिरवा, मतदान करा या विषयांवर प्रबोधनात्मक किर्तन करणार आहेत.  या सामाजिक कार्यक्रमात बहुसंख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष हेमंत भंगाळे,  उपाध्यक्ष योगेश पाटील, सचिव दिलीप साळूंखे,  भरत बेंडाळे,  भुपेश  कुळकर्णी,  जितेंद्र बारी,  भरत वाघ, जयेश सोनगिरे,  नरेश पाटील, गौरव बडगुजर, राकेश ठाकुर यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound