जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील चित्रा चौकातील नीलम वाईन शॉपमध्ये अज्ञात तीन जणांनी दगडाचा दाखवत दुकानातून दोन दारूच्या बाटल्या आणि गल्ल्यातून ७ हजार रुपयांची रोकड जबरी चोरून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी २७ जुलै रोजी ८ वाजता घडली आहे. याप्रकारणी सोमवारी २२ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील चित्रा चौकात नीलम वाईन शॉप दुकान आहे. या दुकानात दारू विक्री केली जाते. दरम्यान रविवारी २१ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात तीन जण दुकानावर आले. तिघांनी दगडाचा धाक दाखवत दुकानात काम करणारा सलीम तडवी याला शिवीगाळ करत दुकानातून २ दारूच्या बाटल्या आणि गल्ल्यातून ७ हजार रुपयांची रोकड जबरी हिसकावून चोरून येण्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत शॉपचे मॅनेजर मुकुंदा भास्कर कोल्हे यांनी जळगाव शहर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी २२ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा ह्या करीत आहे.