भुसावळ प्रतिनिधी । येथील शनी मंदिर वार्ड मधील सोड्याच्या गाडीवरती दोन ते तीन दारू पिणार्यांना अज्ञात इसमांना दुकानाच्या बाजूला बसण्याचे सांगितल्याचा राग आल्याने दुकानदाराच्या डोक्यात बाटली मारण्याची घटना घडल्यामुळे बाजारात लोकांची धावपळ उडाली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शनी मंदिर वार्डातील वैशाली प्रॉव्हिजन स्टोअर्स मागे सोड्याची गाडी लागलेली असुन या गाडीवरती दारू पिण्यासाठी तळीरामांची गर्दी नेहमी असते.सोड्याच्या गाडी जवळ वैशाली प्रोव्हिजन स्टोअर्स असून दुकान मालक सुधीर दत्तात्रय वाणी (वय ६७ ,राहणार शनी मंदिर वार्ड ) यांनी दुकानाचा दरवाजा उघडला असता त्या दुकानाच्या ओट्यावरती दोन ते तीन अज्ञात इसम दारू पित बसलेले होते. दुकान मालकाने त्यांना बाजूला बसण्याचे सांगितल्याचा राग आल्याने त्यांनी दुकानामागे जाऊन सोड्याची बाटली आणून सुधीर दत्तात्रय वाणी यांच्या डोक्यात मारल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या संदर्भात सुनील वाणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला तीन अज्ञात इसमान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आले असून गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते.