चिंचोलीत जेसीबी चालवून दुकानाची तोडफोड; सा.बां.विरोधात निवेदन

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चिंचोली येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नाभिक समाजाच्या दुकानावर जेसीबी चालून केली दुकानाची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन जामनेर तालुका नाभिक समाजाने तहसीलदार यांना लेखी निवेदन देवून केली आहे.

 

तालुक्यातील चिंचोली पिंपरी येथे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ४० दुकानदारांना अतिक्रमणाबाबत नोटीस देण्यात आली होती  सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त नाभिक समाजाच्या गजानन रघुनाथ जाधव व कृष्णा जगन्नाथ जाधव या दोघांच्या अतिक्रमण काढले. त्यामध्ये गजानन रघुनाथ जाधव यांची दुकानाची तोडफोड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी केली असून दुसरीकडे इतर कोणत्याही दुकानदाराचे अतिक्रमण काढले नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्याला विचारणा केली असता, आमच्यावर काय कारवाई करायची ते करा, आम्ही घाबरत नाही अशी दबंगिरी दाखवली आहे.

 

संबंधित घटनेबाबत जामनेर तालुका नाभिक समाजातर्फे नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन बांधकाम विभागाच्या कर्मचारी चौकशी करावी व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावेळी नाभिक समाज  जामनेर तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, जळगाव जिल्ह्याचे युवक अध्यक्ष अनिल शिंदे, जामनेर तालुका दुकानदार संघटनेचे अध्यक्ष कैलास वाघ, शहराचे युवक अध्यक्ष नाना पवार, सुनील जाधव, गजानन मामा राऊत यांच्या सह हार्दिक समाज पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content