धक्कादायक : घराच्या दुसऱ्या मजल्यावरून इंजिनिअर तरूणाने घेतली उडी !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उच्च‍ शिक्षित सॉप्टवेअर इंजिनिअरने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यावल शहरातील महाजन गल्लीत घडली आहे. आत्महत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अक्षय प्रमोद करांडे वय-२७, रा. महाजन गल्ली, यावल असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, अक्षय प्रमोद करांडे या तरूणाने १७ जुन रोजी रात्री ८ते ८ .३० वाजेच्या सुमारास आपल्या महाजन गल्लीतील राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केले असता तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळल्यावर अक्षय यास गंभीर दुखापत झाली. दरम्यान त्यास रात्री तात्काळ उपचारासाठी भुसावळच्या एका खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

या बाबत अद्याप पोलीसात नोंद करण्यात आली नसल्याचे वृत्त आहे. दरम्यान या उच्च शिक्षीत अक्षय करांडे हा पुणे येथे एका खाजगी कंपनीत सॉप्टवेअर अभियंता म्हणुन नौकरीस होता,या तरूणाने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल त्यांने का घेतले हे मात्र स्पष्ठ होवु शकले नाही. अक्षय करांडेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन भुसावळ येथे ट्रामा सेन्टर मध्ये करण्यात आले असुन अक्षय चा मृतदेह अंत्यविधी साठी यावल येथे आणले जात आहे.

Protected Content