एरंडोल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ओळखीचा फायदा घेत, तरूणाने महिलेकडून उसनवारीचे १ लाख ९० हजार रूपये घेतले, त्यानंतर प्रेमाचे नाटक केले, मग लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून महिला गर्भवती राहिली आणि त्यानंतर पैसेही न देता लग्नास नकार देवून फसवणूक केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात नराधमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर रामचंद्र पाटील वय २३ रा. घुसर्डी ता.भडगाव असे नराधमाचे नाव आहे.
एरंडोल तालुक्यातील एका गावात २९ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. खासगी मेस चालवून त्या आपला उदरनिर्वाह करतात. मार्च २०२४ मध्ये महिलेची ओळखी रामेश्वर पाटील याच्याशी ओळखी निर्माण झाली. या ओळखीतून रामेश्वर याने प्रेमाचे नाटक करत तिच्या सोबत लग्न करण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर एरंडोल येथील विविध भागात नेवून पिडीत महिलेवर अत्याचार केला. तसेच याच काळात रामेश्वर याने महिलेकडून उसनवारीने एकुण १ लाख ९० हजार रूपये देखील घेतले. त्यानंतर या अत्याचारातून पीडीत महिला गंर्भवती राहिली. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेसोबत लग्न केले नाही आणि तिचे पैसे देखील परत केले नाही. दरम्यान, याप्रकरणी पीडीत महिलेने एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेवून रामेश्वर पाटील याच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले हे करीत आहे.