Home क्राईम धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवत मुंबई येथील महिलेवर अत्याचार !

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवत मुंबई येथील महिलेवर अत्याचार !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबई येथे राहणाऱ्या एका ३९ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष व प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या नावाखाली आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीला आला आहे. या संदर्भात गुरुवारी ८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तीन जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी येथे फरार झाले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथे कामोठे भागामध्ये ३९ वर्षीय महिला ही वास्तव्याला आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये जळगाव शहरातील भोईटे परिसरात राहणारा मनोज दादाभाऊ निकम वय-३५ याची ओळख महिलेशी झाली. या महिलेला लग्नाची आमिष दाखविले त्यानंतर काही दिवस तिच्यासोबत राहिला. दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर या पीडित महिलेला प्रॉपर्टी घेण्यासाठी सोन्याचे दागिने घेण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी पैसे लागत आहे, असे सांगून या महिलेकडून तब्बल १ कोटी २० लाख रुपये घेतले. दरम्यान या महिलेची फसवणूक करून लग्नास नकार दिल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर या पीडित महिलेने गुरुवारी ८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोज दादाभाऊ निकम वय-३६, दादाभाऊ निकम आणि उषा दादाभाऊ निकम तिघे राहणार भोईटेनगर जळगाव या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर हे करीत आहे.


Protected Content

Play sound