Home क्राईम धक्कादायक : जंगलात नेवून महिलेवर तिघांकडून सामुहिक बलात्कार, दोघांना अटक

धक्कादायक : जंगलात नेवून महिलेवर तिघांकडून सामुहिक बलात्कार, दोघांना अटक


भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महिलेला घरी सोडून देतो असे सांगून भुसावळ तालुक्यातील ग्रामखेडी रोडवरील जंगलात नेवून महिलवेर तिघांवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी २० जूलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात दोन जणांना अटक करण्यात आली असून तिसरा फरार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवारी २० जुलै रोजी रात्री ८ ते ११ वाजेच्या दरम्यान पिडीत महिला ही ग्रामखेडी रोडने आपल्या लहान मुलाला सोबत घेवून जात होती. त्यावेळी संशयित आरोपी दशरथ गोरेलाल भिलाले, कुंदन गोरेलाल भिलाने आणि शंकर भगवानसिंग भिलाले सर्व राहणार भुसावळ यांनी महिलेला घरी सोडून देतो असे सांगून महिलेला दुचाकीवर बसवून जवळच्या जंगलात नेवून तिच्या सामूहिक बलात्कार केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दशरथ गोरेलाल भिलाले, कुंदन गोरेलाल भिलाने आणि शंकर भगवानसिंग भिलाले सर्व राहणार भुसावळ तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख हे करीत आहे.


Protected Content

Play sound