Home क्राईम धक्कादायक : जुगारात हरला बायको ; मित्रांनी केला सामूहिक बलात्कार

धक्कादायक : जुगारात हरला बायको ; मित्रांनी केला सामूहिक बलात्कार


rape
 

लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशमधील जौनपूरमध्ये सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जुगाऱ्याने आपल्या पत्नीलाही पणाला लावले. तो जुगार हारल्यानंतर पतीच्या मित्रांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

 

या संदर्भात अधिक असे की, जौनपुर जिल्ह्यात एक व्यक्तीला दारूचे आणि जुगराचे व्यसन होते. त्याचे दोन्ही मित्र त्याच्या घरीच येऊन मद्यपान करायचे आणि जुगार खेळायचे. एके दिवशी पती सर्व पैसे जुगारात हरला. तेव्हा त्याने जुगारात आपल्या पत्नीलाच पणाला लावले. त्यानंतर पती हरला तेव्हा पतीच्या दोन साथीदारांनी पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. पिडीत महिलेच्या तक्रारीनंतर न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला आहे.

 

न्यायलयाने हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवून घ्यावा असा आदेश न्यायलयाने दिला आहे. तसेच गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर एफआयआरची एक प्रत न्यायालयात द्यावी असे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत.


Protected Content

Play sound