चोपडा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी. | लग्नाचे आमिष दाखवत 21 वर्षे तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात पाच जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील एका गावात 21 वर्षीय तरुणीही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान आशिष समाधान सपकाळे वय- 22 रा.चहाडी ता. चोपडा याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर 21ऑक्टोबर 2022 रोजी अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्यांदा 23 जानेवारी 2019 रोजी देखील शिरपूर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये तिला बोलून अश्लील व्हिडिओ काढलेला आहे असे सांगून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणात संशयित आरोपी आशिष सपकाळे याचे मित्र प्रशांत पाटील आणि त्याचे नातेवाईक समाधान भाईदास सपकाळे, रवींद्र निंबा कोळी आणि अलकाबाई समाधान कोळी यांनी सहकार्य केले. दरम्यान तरुणीने लग्नासाठी तगादा लावला असता संशयित आरोपी अशी सपकाळे याने धमकी दिली. दरम्यान तरुणीने अखेर शुक्रवारी 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार चोपडा पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश्वर हिरे हे करीत आहे.