धक्कादायक : पोहण्यासाठी गेलेल्या दोन्ही मित्रांचा पवना धरणात बुडून मृत्यू; कुटुंबाचा आक्रोश !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील मूळ रहिवासी व हल्ली पुण्याजवळील बालेवाडीतील खाजगी कंपनीत कार्यरत भुसावळातील दोघा उच्च शिक्षीत तरुणांचा पवना धरणात बुडाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी ४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. मयूर रवींद्र भारसके (वय-२५) तर तुषार रवींद्र अहिरे (वय-२६, रा. पद्मावती नगर, भुसावळ. ह.मु. पुणे) अशी मयत दोघांची नावे आहे. या घटनेमुळे नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

पुणे शहरापासून जवळ असलेल्या बालेवाडी येथील स्केन रियालिटी प्राव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीत सिनियर सेल्स एक्झीकेटीव्ह या पदावर कार्यरत मयूर भारसके व तुषार अहिरे हे दोघे मित्र आपल्या अन्य आठ मित्रांसह पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले. दोघां पवना धरणाच्या पाण्यात पोहण्याचा मोह झाल्यानंतर दुपारी चार वाजता वाजता ते पोहण्यासाठी उतरले. पोहताना त्यांना पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले.

दोघे मित्र पाण्यात बुडत असल्याचे पाहून मित्रांनी आरडा-ओरड केली तसेच स्थानिकांना माहिती दिली. शिवदुर्ग रेस्क्यू टिमच्या वतीने धरणात बुडालेल्या दोघांना २० तासांच्या परिश्रमानंतर बाहेर काढण्यात यश आले मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. लोणावळा येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन अग्रवाल यांनी त्यांच्या संस्थेच्या वतीने विना मोबदला थेट खंडाळा (पुणे) येथून भुसावळ येथे मृतदेह पोहच करण्यासाठी शववाहिका उपलब्ध करून दिल्याने दोघा मृत युवकांच्या नातेवाईकांना आधार मिळाला.

धरणात बुडालेल्या तुषार (सोनू) अहिरे याचे वडील रवींद्र अहिरे यांचे गेल्या मार्च महिन्यात निधन झाले तर आजोबा प्रकाश देवराम अहिरे यांचे गत नोव्हेंबर महिन्यात 13 रोजी निधन झाले. या दुःखाःतून परिवार सावरत नहाी तोच घरातील कर्त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटूंबावर मोठार आघात झाला आहे. अहिरे परिवार मूळ खडकदेवळा, ता.पाचोरा येथील रहिवासी असून रेल्वे नोकरीनिमित्त भुसावळात स्थायीक आहे. तर मयूर रवींद्र भारसके हा तीन बहिणींचा एकूलता एक भाऊ होता. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह खडका गावातील काकांच्या निवासस्थानी आणण्यात आल्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. भावाचा मृतदेह पाहून बहिणींनी मन हेलावणारा आक्रोश केला. मयूरच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वीच कोरोना काळात निधन झाले असून कुटूंबाचा तो आधार असतानाच त्याचाही मृत्यू ओढवल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.

Protected Content