धक्कादायक : अल्पवयीन मुलांकडून आठ वर्षाच्या चिमुरडीची सामुहिक बलात्कारानंतर हत्या

Rape Child crime

पुरनिया (वृत्तसंस्था) बिहारमधील पुरनिया जिल्ह्यात तीन अल्पवयीन मुलांनी आठ वर्षाच्या चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी मुलगी टीव्ही पाहण्यासाठी शेजाऱ्यांच्या घरी गेली असता शेजारीच राहणाऱ्या मुलांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर सोमवारी सकाळी कुटुंबीयांना मुलीचा मृतदेह सापडला. यावेळी त्यांनी लोक काय म्हणतील या भीतीने शवविच्छेदन न करताच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला होता. पण आरोपींपैकी एकाने आपल्या मित्राला आपण एका मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी दोन्ही आरोपींना पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले. तर तिसरा आरोपी फरार आहे. तिघं आरोपींपैकी दोघे अल्पवयीन आहेत. आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. मुलीची हत्या करण्याआधी तिच्यावर बलात्कार केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Protected Content