अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील एका भागात राहणाऱ्या २३ वर्षीय तरूणीवर अत्याचार करून तिला गर्भपात करण्यास सांगून मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील एका भागात २३ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून नोकरीला आहे. दरम्यान, संशयित आरोपी रत्नाकार सुभाष पाटील रा. अमळनेर याने तरूणीवर अत्याचार करून तिला गर्भवती केले. त्यानंतर गर्भपात करून तिला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली.
हा प्रकार सन २०२१ पासून सुरू होता. हा प्रकार सहन न झाल्याने तरूणीने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी रत्नाकर सुभाष पाटील रा. अमळनेर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप हे करीत आहे.