जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गणेश कॉलनी येथे राहणाऱ्या एका नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साई उर्फ ओम पंडित चव्हाण वय-१५, रा.गणेश कॉलनी, जळगाव असे मळ्यात झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरामध्ये ओम चव्हाण हा आपल्या आई-वडील, बहीण व आजी सोबत वास्तव्याला होता, तो जळगाव शहरातील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होता. सोमवारी २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याचे आई-वडील हे दवाखान्यात गेलेले होते तर आजी ही शेजारी गेलेले असताना तो घरी एकटा अभ्यास करत बसलेला होता. त्यावेळी त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. त्याचे आई-वडील हे दवाखान्यातून घरी आल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद होता त्यावेळी वडिल पंडीत चव्हाण यांनी दरवाजा ठोठावला, परंतु आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता ओमने गळफास घेतल्याचे दिसून आले. यावेळी त्याच्या आई-वडिलांनी प्रचंड आक्रोश केला व दरवाजा तोडून त्याला खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.