अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील शिवपार्वती नगरात येथे मामाकडे आईसोबत आलेल्या आलेल्या मुंबईच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने बेडरूममध्ये दोरीने गळफास आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी १८ मे रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी शनिवारी १८ मे रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दर्शील विजय मोरे वय १४ रा. नवी मुंबई असे मयत झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, नवी मुंबई येथील दर्शील मोरे हा काही दिवसांपासून अमळनेर शहरातील शिवपार्वती नगरात मामाकडे आई संजना यांच्यासोबत आला होता. शनिवारी १८ मे रोजी दुपारी २ वाजता दर्शील हा आईसोबत अमळनेर शहरातील यात्रेत जाण्यासाठी तयार झाला. त्यामुळे ते कपडे बदलविण्यासाठी बेडरूममध्ये गेला. बराच वेळ झाला परंतू दर्शील हा बाहेर आला. दरवाजा देखील ठोठावला परंतू कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर खोलीच्या बाहेर जावून खिडकीतून डोकावून पाहिले असता त्याने दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. अखेर कुऱ्हाडीने दरवाजा तोडून त्याला खाली उतरविले. व अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. मुलाच्या मृत्यूमुळे आई संजना यांनी हंबरडा फोडला. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ संतोष पवार हे करीत आहे.