धक्कादायक : मोबाइल काढून घेतल्याने मुलाने वडिलांचे हात,पाय आणि मान कापली

बेळगाव (वृत्तसंस्था) रात्री उशिरापर्यंत मोबाइलवर गेम खेळणाऱ्या मुलाला वडिलांनी झोप म्हणून सांगितले. मुलगा सांगूनही ऐकत नसल्याने त्यांनी मुलाचा मोबाइल काढून घेतला.त्यामुळे संतापाच्या भरात मुलाने आपल्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली आहे.

 

 

या संदर्भात अधिक असे की, सिद्धेश्वर नगर ,काकती येथे शंकर देवाप्पा कुंभार हे आपल्या परिवारासह राहतात. मुलगा रघुवीर कुंभार हा रविवारी रात्री उशिरापर्यंत मोबाइलवर गेम खेळत होता. म्हणून शंकर कुंभार यांनी रघुवीरला झोप म्हणून सांगितले. परंतु रघुवीर सांगूनही ऐकत नसल्याने त्यांनी मोबाइल काढून घेतला.त्यामुळे संतापलेल्या रघुवीरने आजूबाजूच्या घरावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या. शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यावर पोलिसांनी रघुवीर आणि पालकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून समज दिली. रात्री घरी येऊन मग दोघं जण झोपले. मात्र, मोबाइल घेतल्याचा राग रघुवीरच्या डोक्यात होता. उठल्यानंतर त्याने घरातील विळी घेऊन वडिलांची हत्या केली. हत्या केल्यावर त्याने वडिलांचे हात, पाय आणि मान कापली.

Protected Content