Home क्राईम धक्कादायक : अत्याचारातून गर्भवती झालेल्या अपंग महिलेची आत्महत्या; तीन जणांवर गुन्हा दाखल

धक्कादायक : अत्याचारातून गर्भवती झालेल्या अपंग महिलेची आत्महत्या; तीन जणांवर गुन्हा दाखल


चोपडा प्रतिनिधी ।  मेहुण्यासह इतर तिन जणांनी अत्याचार करून गर्भवती केलेल्या ३७ वर्षीय अपंग महिलेने आत्महत्या केल्या धक्कादायक घटना तालुक्यातील एका गावात  उघडकीला आली आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

‍सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात ३७ वर्षीय महिला आपल्या भावासह वास्तव्याला आहे. महिला ही अपंग असल्याने ही भावाकडे राहते. दरम्यान तिचे मेहुण्यासह इतर तिन जणांनी या तिन भावांनी अपंग पणाचा फायदा घेत पीडीत महिलेवर वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून महिला ६ महिन्याची गर्भवती राहिली. हा त्रास सहन न झाल्याने पीडीत महिलेने २४ जानेवारी रोजी सकाळी आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी पीडीत मुलीच्या भावाच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किरण दांडगे करीत आहे.

 


Protected Content

Play sound