Home क्राईम धक्कादायक! गुंतवणुकीच्या नावाखाली १ कोटी २२ लाख रुपये हडपले !

धक्कादायक! गुंतवणुकीच्या नावाखाली १ कोटी २२ लाख रुपये हडपले !

0
170

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गुंतवणूकीचे आमिष दाखवून अठ्ठावीस महिन्यात दाम दुप्पट करून देतो असे सांगून नागपूर येथील एका वकीलासह त्यांच्या नातेवाईकांची तब्बत १ कोटी २२ लाखा रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुगलकिशोर टिकमचंद गिल्डा वय ६५ रा. धमपेठ, नागपूर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. वकील व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान १ जानेवारी २००६ पासून ओळखीच्या सबंधातून त्यांची व त्यांच्या नातेवाईकांना रामदेवबाबा बिल्डर ॲण्ड डेव्हलपर्स प्रा.लि. आर्वी जिल्हा वर्धा या संस्थेत पैसे गुंतवल्यास २८ महिन्यात रक्कम दुप्पट करून मिळले असे आमिष गोपाल हरीकिसन चांडक व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविले. त्यानुसार जुगलकिशोर गिल्डा यांनी विश्वास ठेवून वेळेनुसार त्यांना पैसे दिले. दरम्यान आतापर्यंत त्यांना भरलेल्या पैशांचा कोणताही मोबदला मिळाला नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जुगलकिशोर गिल्डा यांनी अखेर शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३वाजता याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गोपाल हरीकीसन चांडक, मोहन हरीकिसन चांडक, शारदादेवी हरीकिसन चांडक, गणेश विठ्ठल चांडक, शिल्पा गोपाल चांडक, सुजाता मोहन चांडक सर्व राहणार आर्वी जि. वर्धा यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound