Home Cities अमळनेर धक्कादायक : चिमुरडीसोबत अश्लील कृत्य; नराधमास अटक !

धक्कादायक : चिमुरडीसोबत अश्लील कृत्य; नराधमास अटक !


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे शिवारात एका ४ वर्षीय बालिकेचा बाललैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना ३१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता पीडित बालिकेच्या मातेने दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी मनोहर राजेंद्र पाटील याला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही गेल्या काही महिन्यांपासून आपल्या माहेरी कळमसरे येथे वास्तव्यास आहे. ३१ डिसेंबर रोजी सकाळी त्या आपल्या मुलांसह शेतात कपाशी वेचण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांची ४ वर्षांची मुलगी झाडाखाली एकटीच बसलेली असताना, संशयित आरोपी मनोहर पाटील याने तिची अश्लील कृत्य करत असतानाच पीडितेची आई तिथे पोहोचली. आईला पाहताच आरोपीने तेथून पळ काढला. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound